अकोला- अकोल्यामध्ये 37 रुग्ण पॉझिटिव सापडले आहेत. 21 रुग्णांची रॅपिड टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यामध्ये 16 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 45 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सकाळी आलेल्या अहवालांमध्ये 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 7 महिला तर 9 पुरुष रुग्ण आहेत. त्यात कच्ची खोली येथील 5, अकोट येथील 3, सिंधी कॅम्प व नानकनगर येथील प्रत्येकी 2 तर उर्वरित जीएमसी, पक्की खोली, आदर्श कॉलनी, अकोट फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच 5 व 6 जुलै रोजी पातूर येथे करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये (11 व 10) असे 21 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. त्यांचा समावेश आज करण्यात आला आहे.
दरम्यान, उपचार घेताना खैर महम्मद प्लॉट येथील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना 27 जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. दुपारनंतर 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील 5 जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर 40 जणांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोविड केअर सेंटर येथून घरी सोडण्यात आले.
आज प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल- 134
पॉझिटिव्ह- 16