अकोला- जिल्ह्यातील 230 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज सकाळी आले असून त्यातील 42 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर 188 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या 42 रुग्णांमध्ये 19 महिला व 23 पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील 6, अकोट फैल येथील 5, समर्थनगर पातूर येथील 4, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी 3, डाबकी रोड येथील 2 तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.
आज सकाळी प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल- 230
पॉझिटिव्ह अहवाल-42