महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2021, 12:20 PM IST

ETV Bharat / briefs

कोल्हापुरात तब्बल 40 जणांचा मृत्यू तर 1 हजार 122 नवे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 66 हजार 725 वर पोहोचली आहे. त्यातील 55 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Kolhapur Corona update
कोल्हापूर कोरोना अपडेट

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेेल्या 24 तासात तर कोल्हापुरात तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 122 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 941 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 66 हजार 725 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 66 हजार 725 वर पोहोचली आहे. त्यातील 55 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 941 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 218 झाली आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षाखालील - 85 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2390 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4730 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 36397 रुग्ण
51 ते 70 वर्ष -18481 रुग्ण
71 वर्षांवरील - 4642 रुग्ण जिल्ह्यात असे एकूण 66 हजार 725 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 1292
2) भुदरगड - 1688
3) चंदगड - 1449
4) गडहिंग्लज - 2039
5) गगनबावडा - 238
6) हातकणंगले - 6846
7) कागल - 2034
8) करवीर - 7585
9) पन्हाळा - 2487
10) राधानगरी - 1486
11) शाहूवाडी - 1794
12) शिरोळ - 3386
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 9333
14) कोल्हापूर महानगरपालिका - 21392
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3677

ABOUT THE AUTHOR

...view details