महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

मुंबईतील 'या' चार कोरोना आरोग्य केंद्राचे मंगळवारी मुंख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण - Corona health centre mumbai

मुलुंड, दहिसर, महालक्ष्‍मी रेसकोर्स आण‍ि वांद्रे-कुर्ला संकूल या 4 ठिकाणी कोरोना आरोग्‍य केंद्र उभारली आहेत. या चार केंद्रात एकूण 3 हजार 520 बेड कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्‍ध होणार आहेत.

Corona health centre mumbai
Corona health centre mumbai

By

Published : Jul 6, 2020, 10:57 PM IST

मुंबई - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने मुलुंड, दहिसर, महालक्ष्‍मी रेसकोर्स आण‍ि वांद्रे-कुर्ला संकूल या 4 ठिकाणी कोरोना आरोग्‍य केंद्र उभारली आहेत. या चार केंद्रात एकूण 3 हजार 520 बेड कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्‍ध होणार आहेत. या चारही कोरोना केंद्रांचे लोकार्पण मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते व्‍ह‍िड‍िओ कॉन्‍फरन्‍सद्वारे उद्या (7 जुलै) करण्‍यात येणार आहे.

लोकार्पण होत असलेल्‍या केंद्रांपैकी, मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्‍या जागेत 1 हजार 700 खाटांचे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र 'सिडको'च्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. यातील सुमारे 500 रुग्‍णशय्या ठाणे महानगरपालिकेसाठी आरक्ष‍ित करून देण्‍यात आल्‍या आहेत. दहिसर (पूर्व) येथे 'मुंबई मेट्रो'च्या सहकार्याने सुमारे 900 खाटांचे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र उभारण्यात आले आहे. तर दहिसर (पश्चिम) येथे कांदरपाडा पर‍िसरात समर्पित कोरोना रुग्‍णालय उभारण्‍यात आले असून याठ‍िकाणी 108 अतिदक्षता उपचार (आयसीयू) सुविधा असलेल्‍या खाटा उपलब्‍ध आहेत.

महालक्ष्‍मी रेसकोर्स येथे समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्र उभारण्‍यात आले असून तेथेही 700 रुग्‍णशय्या उपलब्‍ध आहेत. तर वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्‍यावतीने उभारण्‍यात आलेल्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यातील समर्पित कोरोना आरोग्‍य केंद्रात 112 रुग्‍णशय्या अतिदक्षता उपचार (आयसीयू) करण्‍यासाठी असतील. एमएमआरडीएने हा दुसरा टप्‍पादेखील महानगरपालिकेकडे हस्‍तांतर‍ित केला असून ते आता प्रत्‍यक्ष कार्यान्‍व‍ित केले जाणार आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर खाटा उपलब्‍ध होणार असल्‍याने कोविड 19 संसर्ग बाधितांच्या उपचारासाठी मोठी सोय होणार आहे.

या समारंभात राज्‍याचे वस्‍त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्‍लम शेख, राज्‍याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्‍य ठाकरे, मुंबईच्‍या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, राज्‍याचे मुख्‍य सचिव संजीव कुमार, बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल, सिडकोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक लोकेश चंद्र, मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्‍यासह विविध मान्‍यवर ठिकठिकाणच्‍या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details