अकोला - आज सायंकाळी आलेल्या अहवालांमध्ये 20 जण, तर सकाळचे 19 असे मिळून 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सकाळी एक व दुपारी दोन असे मिळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज सायंकाळी 20 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 7 महिला व 13 पुरुष आहेत. त्यातील 4 जण गंगानगर येथील, 3 जण सिंधी कॅम्प येथील, 3 जण बाळापूर येथील, 2 जण गजानन नगर येथील, 2 जण अकोट येथील तर उर्वरीत हरिहरपेठ, पातूर, घुसर, हातरून, तारफैल व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, दुपारनंतर 2 जणांचा मृत्यू झाला. त्यात रांजणगाव जळगाव जामोद जि. बुलडाणा येथील एका 45 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. ही महिला 21 जूनला रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, अन्य एक 71 वर्षीय पुरुष रुग्ण असून हा रुग्ण अकोट येथील रहिवासी आहे. हा रुग्णही 22 जूनला रुग्णालयात दाखल झाला होता. तर त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दुपारनंतर कोविड केअर सेंटर येथून 25 जणांना तर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातून 10 जणांना, असे एकूण 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिवसभरातील अहवाल
प्राप्त अहवाल-289
पॉझिटिव्ह अहवाल-39