भंडारा -जिल्ह्यात आज (शनिवार) 8 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून जिल्ह्यात आतापर्यंत 39 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 49 इतकी असून 10 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. आज एकही नवीन व्यक्ती पॉझिटीव्ह सापडला नाही.
आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे इतर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून आलेले आहेत. अजूनही नागरिकांचा जिल्ह्यात परत येण्याचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत 2 हजार 669 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी 49 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 609 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 11 नमुन्यांचा अहवाल प्राप्त अजून आलेला नाही.
आज शनिवार (13 जून) रोजी आयसोलेशन वार्डमध्ये 23 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 392 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 143 भरती आहेत. 2 हजार 126 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 41 हजार 596 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात परतले आहेत. यातील 33 हजार 720 व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 7 हजार 876 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
भंडाऱ्यामध्ये इतर जिल्ह्यातूनच नाही तर परराज्य आणि विदेशावरून ही नागरीकांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या सर्वांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवून त्यांच्या घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविणे सक्तीचे केले आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच या नागरिकांना घरी सोडले जात आहे.