महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

पुण्यात मागील 24 तासात कोरोनाचे 1 हजार 512 नवे रुग्ण, 37 बळी - Corona deaths pune

आज दिवसभरात शहरात कोरोनाचे 1 हजार 512 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 805 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 35 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 21, 2020, 11:17 PM IST

पुणे- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना आढळून येत आहे. मागील 24 तासात पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात शहरात कोरोनाचे 1 हजार 512 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 805 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पुुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 35 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 40 हजार 715 रुग्ण सापडले आहेत. यातील उपचाराअंती बरे झालेल्या 24 हजार 246 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 15 हजार 434 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 616 रुग्ण गंभीर असून यातील 99 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details