पुणे- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना आढळून येत आहे. मागील 24 तासात (रविवार) पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तब्बल 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 26 रुग्ण हे पुणे शहरातील, 10 पुणे ग्रामीण परिसरातील, तर एक जिल्ह्याबाहेरचा आहे.
पुण्यात 24 तासात 37 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 621 जण कोरोनाबाधित - 37 Corona death's pune
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 27 हजार 525 रुग्ण सापडले आहेत. यात उपचाराअंती बरे झालेल्या 17 हजार 482 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 9 हजार 203 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 487 रुग्ण गंभीर असून यातील 172 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
Covid 19
आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 621 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 486 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 840 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.