धुळे -जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील काही मंडळींनी हजेरी लावल्याचे समोर आले आहे. बाम्हणे येथील ही व्यक्ती थाळनेर दामशेरपाडा येथील जावई होता. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर थाळनेर येथील त्याच्या ३५ नातेवाइकांचे विलगीकरण करण्यात आले असुन त्यातील त्या मृत व्यक्तीच्या दोन शालकांना हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून शिंगावे कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
धुळे : कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्ययात्रेला गेलेल्या 35 जणांचे विलगीकरण
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील एका व्यक्तीचा मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही व्यक्ती थाळनेर येथील जावई होती. त्यामुळे थाळनेर येथील दामशेरपाडा भागातील नातेवाईक देखील बाम्हणे येथे अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील एका व्यक्तीचा मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही व्यक्ती थाळनेर येथील जावई होती. त्यामुळे थाळनेर येथील दामशेरपाडा भागातील नातेवाईक देखील बाम्हणे येथे अंत्यसंस्काराला उपस्थित होते. मात्र, या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले. अंत्ययात्रेत सहभागी व्यक्तींचा तपासाबाबत थाळनेर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना माहिती मिळाली की, बाम्हणे येथे त्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी थाळनेर येथील दामशेरपाडा भागातील काही जण उपस्थित होते. याप्रकरणी संपूर्ण चौकशी केल्यानंतर त्या मृत व्यक्तीला थाळनेर दामशेरपाडा येथील दोघ शालकांनी अंघोळ घातली होती. त्यामुळे या दोघांना हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून शिंगावे कोवीड सेंटर येथे पाठवण्यात आले आहे. तर अंत्यसंस्काराला गेलेल्या इतर ३३ जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आले आहे.