ठाणे- कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असून गेल्या २४ तासात ३३० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यत महापालिका हद्दीत १२ हजार ३६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज नव्याने आढळून आलेल्या ३३० रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ४९५ वर जाऊन पोहोचली आहे.
कल्याण-डोंबिवलीत 330 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर आतापर्यत १२ हजार ३६५ रुग्णांना डिस्चार्ज - Corona patients number thane
गेल्या २४ तासात ३३० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यत महापालिका हद्दीत १२ हजार ३६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यत ३०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ५ हजार ८२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजच्या ३३० रुग्णांची विगतवारी पाहता कल्याण पूर्व ८६, कल्याण प. ६७, डोंबिवली पूर्व ९९, डोंबिवली प. ४५ , मांडा टिटवाळा 9, मोहना 16 तर पिसवली येथील 8 रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज दिवसभरात २१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात टाटा आमंत्रा कोविड केयर सेंटर येथील १२४, सावळाराम क्रीडा संकुल येथील कोविड रुग्णालयातील १६, बाज, आर.आर पाटील रुग्णालयातील १२, तर होलीक्रॉस कोविड सेंटर येथील २ रुग्णांचा समावेश आहे. तर सद्यास्थितीत ५ हजार ८२३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.