ठाणे- विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या 5 पैकी 3 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. तर कोरोनाबाधित आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांवर विलगीकृत होण्याची वेळ आली आहे.
उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी एका गुन्ह्या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली होती. या आरोपींना नंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींना कोठडीत डांबण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करणे बधंनकारक आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांची आरोग्य तपासणीसह कोरोना टेस्ट केली. त्यात 5 पैकी 3 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. आता त्यांना पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.