महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

धुळे: जिल्ह्यात काल दिवसभरात 27 नवे कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या 1 हजार 623 वर - 27 new corona positive dhule

काल (13 जुलै) दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर धुळे शहरातील 86 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 14, 2020, 4:15 PM IST

धुळे- जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 1 हजार 623 वर पोहोचली आहे. त्यातील 959 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 78 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 27 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह असलेल्यांमध्ये धुळे शहरातील 9, शिरपूर तालुक्यातील 7, धुळे तालुक्यातील 3 आणि शिंदखेडा तालुक्यातील 8 अशा 27 रुग्णांंचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर काल (13 जुलै) दिवसभरात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर धुळे शहरातील 86 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 19 रुग्णांनी कोरोनावर मात करत डिस्चार्ज मिळवले आहे. धुळे शहरातील 15 शिरपूर तालुक्यातील 3, धुळे तालुक्यातील 1,अशा 19 रुग्णांंनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे

धुळे शहर-791

बरे झाले- 596

मृत- 38

धुळे ग्रामीण- 832

बरे झाले- 433

मृत-40

धुळे तालुका- 85

बरे झाले- 37

मृत- 6

शिरपूर शहर / ग्रामीण- 566

बरे झाले- 313

मृत- 22

शिंदखेडा तालुका- 108

बरे झाले- 37

मृत- 5

साक्री तालुका- 73

बरे झाले- 46

मृत- 7

जिल्ह्याबाहेर असलेले रुग्ण

एकूण- 61

बरे झालेले- 37

मृत- 8

ABOUT THE AUTHOR

...view details