महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

'एका मुलीवर प्रेम करून चूक झाली', सुसाईड नोट लिहून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या - Love affair youth suicide aurangabad

वाळूज परिसरातील बजाजनगर भागात रहिवासी असलेला ऋषीकेश भाऊसाहेब लहाने (वय २५) हा कंपनीत काम करतो. गेल्या काही दिवसांपासून ऋषिकेश नैराश्यात होता.

Youngster suicide aurangabad news
तरूणाची रेल्वे रूळावर उडी घेऊन आत्महत्या

By

Published : Apr 27, 2021, 5:00 PM IST

Updated : Apr 27, 2021, 5:18 PM IST

औरंंगाबाद -मी एका मुलीवर प्रेम करून चूक झाली. आता मी स्वतः आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, अशी चिठ्ठी लिहून बजाज नगर येथील २५ वर्षीय तरुणाने रेल्वे रूळावर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळुज परिसरातील बजाजनगर भागात रहिवासी असलेला ऋषीकेश भाऊसाहेब लहाने (वय २५) हा कंपनीत काम करतो. गेल्या काही दिवसांपासून ऋषिकेश नैराश्यात होता. सोमवारी नगर रोडवर असलेल्या पुलाच्या खाली रेल्वे रूळावर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २६) सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, नगर रोडवरील प्रवाशांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृताच्या खिशात असलेल्या कागद पत्रावरून ओळख पटली.

पोलिसांनी ऋषीकेश याची तपासणी केली असता त्याच्या खिशात सुसाइ़ड नोट आढळली. त्यात म्हटले आहे, की मी एका मुलीवर प्रेम करून चूक झाली असून आता मी स्वतः आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असेही त्याने लिहिले. याप्रकरणी, छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक हसीना शेख करीत आहे.

Last Updated : Apr 27, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details