नाशिक- नववर्ष यात्रा स्वागत समितीतर्फे नाशिकच्या पंचवटी येथील गोदाघाट पटांगनात 25 हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. शहरातील 500 महिला रांगोळी कलाकारांनी एकत्र येत 10 टन रांगोळीचा वापर करून अवघ्या दोन तासात ही महारांगोळी साकारली आहे.
नाशिकमध्ये नववर्षानिमित्त 500 महिला कलाकारांनी साकारली 25 हजार चौरस फुटांची 'महारांगोळी'
यावर्षी आपले सण आपली संस्कृती हा महारांगोळीचा विषय असून मानवी जीवन, संस्कृती व अध्यात्म यांचे सामंजस्य या महारांगोळीतून दर्शविण्यात आले
यावर्षी आपले सण आपली संस्कृती हा महारांगोळीचा विषय असून मानवी जीवन, संस्कृती व अध्यात्म यांचे सामंजस्य या महारांगोळीतून दर्शविण्यात आले आहे.
मानवी शरीरातील सप्तधातु हे विविध सात रंगानी यात दर्शवण्यात आले आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची दैवते म्हणून ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या मूर्ती रांगोळीत ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय संस्कृतीत त्यागाचे प्रतीक म्हणून भगवा रंग ओळखला जातो तो या महारांगोळीत मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वानी मतदान करावे, असा संदेशही देण्यात आला आहे. ही रांगोळी बघण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून नागरिक गर्दी करत आहेत.