अकोला - आज सकाळी कोरोना संशयित्यांचे अहवाल प्राप्त झाले आहे. 238 अहवालांपैकी 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार 161 झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण हे 360 झाले आहेत.
प्राप्त 25 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये 9 महिला व 16 पुरुष आहेत. त्यात आदर्श कॉलनी येथील 4, शंकर नगर, अशोक नगर, न्यू साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी 2, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगाव मंजू, मुकुंद वाडी, हरिहर पेठ, हैदरापुरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची स्थिती पुढील प्रमाणे आहे;
प्राप्त अहवाल- 238
पॉझिटिव्ह- 25