चंद्रपूर -जिल्ह्यात मागील 24 तासात 2151 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 1180 नवीन बाधितांची भर पडली आहे. याबरोबरच 22 बाधितांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 71 हजार 728वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 56 हजार 599 झाली आहे. सध्या 14 हजार 27 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 12 हजार 583 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 36 हजार 639 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष, महाकाली वार्ड येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, नेहरू नगर वार्ड परिसरातील 70 वर्षीय पुरुष, संजय नगर येथील 60 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, जीवन ज्योती कॉलनी रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष.
राजुरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष.
ब्रह्मपुरी तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 81 वर्षीय पुरुष, चिखल परसोडी येथील 62 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर येथील 62 वर्षीय पुरुष, करंजी येथील 60 वर्षीय पुरुष.
चिमूर तालुक्यातील काजळसर येथील 35 वर्षीय महिला.
वरोरा तालुक्यातील 42 व 50 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.