मुंबई- सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील 2 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगावमधील दोन रुग्णालयांचा समावेश - Kyle's dr Prabhakar more hospital
राज्याच्या सीमेलगतच्या भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, असे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.
बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय रिसर्च सेंटर आणि केएलईएस कॅन्सर रुग्णालय या 2 रुग्णालयांचा जनारोग्य योजनेत सहभाग करून घेण्यासाठी राज्यमंत्री डॉ. यड्रावकर यांनी पाठपुरावा केला होता. डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाचे सुमारे 2 हजार बेड व विशेषज्ञ सुविधा या योजनेंतर्गत उपलब्ध होणार असून कॅन्सर रुग्णालयातील 125 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये कर्करोग उपचार, शस्त्रक्रिया, रेडीएशन आदी सुविधा मिळणार आहेत.
राज्यात जनारोग्य योजनेमध्ये यापूर्वी 450 रुग्णालयांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांची व्याप्ती वाढवत दुप्पट म्हणजे 1 हजार रुग्णालयांचा सहभाग करण्यात आला आहे. राज्याच्या सीमेलगतच्या भागातील रुग्णालयांचा समावेश या योजनेत झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नागरिकांना त्याचा फायदा मिळेल, असे आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले.