सोलापूर - गेेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्यातील नागरिकांकडे महावितरणाचे तब्बल १९७ कोटी रुपये थकित असल्याची बाब समोर आली आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम गेल्यामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने अनेकांनी वीजबिले भरली नसल्याने परिणामी महावितरणाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
महावितरणला 'शॉक'.. लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात 197 कोटीेचे वीजबिल थकित
टाळेबंदीच्या काळात वीजबिल सक्तीने वसूल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर, या कालावधीतले वीज बिल माफ करण्याची मागणी अनेक पक्षांनी केली. त्यामुळे बिले माफ व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे वीज बिले भरण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी गेेल्या सहा महिन्यापासून जिल्ह्यातील नागरिकांकडे महावितरणाचे तब्बल १९७ कोटी रुपये थकले आहे. ₹
24 मार्चला राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये महावितरणच्या वतीने सरासरी पध्दतीने ऑनलाइन बिले ग्राहकांना देण्यात आली. यानंतर बिले अदा करण्यात आली. ही बिले जेव्हा आली तेव्हा पूर्वी ऑनलाइन पध्दतीने देण्यात आलेल्या बिलांची अदा झालेली रक्कम वजा करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या तक्रारी सोडवण्यासाठी महावितरणने प्रत्येक उपविभागीय कार्यालयात तक्रार निवारण केंद्र सुरू केले. या केंद्राद्वारे तक्रारी सोडवण्यात आल्या. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद पडले, रोजगार गेल्याने लोकांची आर्थिक स्थिती बिघडली. सध्या अनलॉकनंतर काही प्रमाणात व्यवसाय सुरू झाले मात्र ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत, अशा वातावरणात लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
टाळेबंदीच्या काळात वीजबिल सक्तीने वसूल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर, या कालावधीतले वीज बिल माफ करण्याची मागणी अनेक पक्षांनी केली. त्यामुळे बिले माफ व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे वीज बिले भरण्याचे प्रमाण कमी झाले. सध्या जिल्ह्यातील ४,११,५६८ घरगुती वीज ग्राहकांचे १४१ कोटी ५९ लाख रुपये, ४२,७९० रुपये, व्यापारी वीज ग्राहकांचे ३० कोटी ८१ लाख रुपये, ९४३५ औद्याेगिक वीज ग्राहकांचे २४ कोटी २९ लाख रुपये असे एकूण ४,६४,४११ लघुदाब वीज ग्राहकांचे १९६ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे. तर सप्टेंबर महिन्यात लघुदाब वीज ग्राहकांनी ६६ लाख रुपये वीज बिल अदा केल्याची माहिती आहे.