महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नवी मुंबईत 197 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 125 जण बरे होऊन परतले घरी

नवी मुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य आटोक्यात यावी म्हणून नवी मुंबईत सोमवार पासून 29 जून ते 5 जुलै दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

By

Published : Jun 28, 2020, 7:36 PM IST

New Mumbai corona update
New Mumbai corona update

ठाणे- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 6 हजारच्या पार गेला असून आजही चक्क 197 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज 125 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत मृतांचा आकडाही 205 च्या घरात पोहोचला असून कोरोनामुळे आज 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 6 हजार 211 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 19 हजार 814 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 12 हजार 485 जण निगेटिव्ह आले असून, 1 हजार 129 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 200 इतकी आहे.

आज आढळलेल्या 197 कोरोना पॉझिटिव्हमध्ये तुर्भेमधील 7, बेलापूरमधील 19, कोपरखैरणेमधील 35, नेरुळमधील 36, वाशीतील 16, घणसोलीमधील 36, ऐरोलीमधील 33, दिघ्यातील 5 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये 61 स्त्रिया व 136 पुरुषांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 530 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तसेच, बेलापूरमधील 5, नेरूळमधील 13, वाशीमधील 34, तुर्भेमधील 6, कोपरखैरणेमधील 30, घणसोलीमधील 21, ऐरोलीमधील 15, दिघा 1 अशा एकूण 125 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 36 स्त्रिया आणि 89 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात सद्यस्थितीमध्ये 2 हजार 456 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 205 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य आटोक्यात यावी म्हणून नवी मुंबईत सोमवार पासून 29 जून ते 5 जुलै दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details