महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अकोल्यात 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह, तर एका रुग्णाचा मृत्यू

काल रात्री उपचार घेताना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका 65 वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला 29 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा काल मृत्यू झाला असून तिचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला आहे.

Akola government hospital
Akola government hospital

By

Published : Jul 2, 2020, 3:07 PM IST

अकोला - आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 19 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर तेल्हारा येथील एका 65 वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात 10 महिला व 9 पुरुषांचा समावेश आहे.

आज आढळलेल्या 19 कोरोनाबाधितांपैकी 2 जण तेल्हारा येथील, 2 जण खदान, 2 जण गुळजारपुरा, 2 जण हरिहर पेठ, 2 जण अकोट फैल येथील, तर उर्वरित वाशिम रोड, गाडेगाव, खैर मोहम्मद प्लॉट, मलकापूर जि. बुलडाणा, हातरून, आळशी प्लॉट, काळा मारोती, अकोट व हामजा प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, काल रात्री उपचार घेताना तेल्हारा येथील रहिवासी असलेल्या एका 65 वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला. ही महिला 29 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा काल मृत्यू झाला असून तिचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला आहे.

आज सकाळचा अहवाल

प्राप्त अहवाल-213

पॉझिटिव्ह अहवाल-19

निगेटिव्ह-194

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 1587

मृत-81

डिस्चार्ज-1165

ABOUT THE AUTHOR

...view details