महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

बुलडाण्यात पुन्हा आढळलेत 18 कोरोनाबाधित, तर 2 रुग्णांची कोरोनावर मात - 18 new corona positive buldana

आज रोजी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2 हजार 698 आहेत. जिल्ह्यात एकूण 253 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 2, 2020, 3:53 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काल (1 जून) 115 व्यक्तींचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. यापैकी 97 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये नांदुरा येथील 28 वर्षीय पुरुष, दाल फैल खामगाव येथील 43 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 23 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगी व 26 वर्षीय पुरुष, तसेच कादंपुरा खामगाव येथील 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला व 18 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात एकूण 9 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तसेच, पारपेठ मलकापूर येथील 8 वर्षीय मुलगा, अमोना ता. चिखली येथील 30 वर्षीय पुरुष, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 19 वर्षीय तरुण, 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, मूळ देऊळगाव ता. जामनेर, जि. जळगाव येथील 65 वर्षीय महिला आणि बुलडाणा येथील 19 वर्षीय तरुणाचा पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये समावेश आहे. तसेच, 2 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये हाश्मी नगर मलकापूर येथील 35 वर्षीय महिला व धामणगाव बढे ता. मोताळा येथील 9 वर्षीय मुलाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 2 हजार 698 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

आज रोजी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2 हजार 698 आहेत. जिल्ह्यात एकूण 253 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयात सध्या 87 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आजपर्यंत 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details