महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

औरंगाबादमध्ये कोरोनाचे 166 नवे रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 7 हजार 504वर

आतापर्यंत एकूण 7 हजार 504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4 हजार 33 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3 हजार 141 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Aurangabad hospital
Aurangabad hospital

By

Published : Jul 9, 2020, 3:01 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात आज दुपार पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 90 पुरुष तर 76 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7 हजार 504 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4 हजार 33 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3 हजार 141 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात कांचनवाडी (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), पद्मपुरा (1), अविष्कार कॉलनी एन सहा (1), जटवाडा रोड (1), जयसिंगपुरा (2), राम नगर (1), बालाजी नगर (1), शुभमंगल विहार (1), विशाल नगर (2), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (2), स्वामी विवेकानंद नगर (4), रमा नगर (9), विठ्ठल नगर (3), रेणुका नगर (3), अमृतसाई प्लाजा (2), जय भवानी नगर (1), एन बारा हडको (1), पवन नगर (1), किर्ती सो. (3), रायगड नगर (9), मिसारवाडी (1), म्हाडा कॉलनी (1), सातारा परिसर (2), गजानन कॉलनी (1), चिकलठाणा (1), एन अकरा, सिडको (1), मुकुंदवाडी (1), संजय नगर (1), अजब नगर (6), गजानन नगर (2), श्रद्धा कॉलनी (1), लक्ष्मी कॉलनी (2), भक्ती नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), हनुमान नगर (1), अरिहंत नगर (3), बंजारा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (3), पुंडलिक नगर (1), खोकडपुरा (7), नारेगाव (2), सेव्हन हिल (1), टाईम्स कॉलनी (1), राम नगर (1), जाधववाडी (1), विजय नगर (1), गजानन नगर, गारखेडा परिसर (1) या परिसरातील रुग्ण आहे. तर ग्रामीण रुग्ण भागत 65 नवे रुग्ण आढळून आले आहेत, ज्यात कन्नड (1), जाकीर हुसेन नगर, सिल्लोड (1), अजिंठा (1), गोकुळधाम सो. बजाज नगर (6), नेहा विहार, सिडको महानगर, बजाज नगर (4), जय भवानी चौक, बजाज नगर (4), गणेश सो. बजाज नगर (1), जगदंबा सो., वडगाव (1), सिडको वाळूज महानगर एक (2), फुले नगर, पंढरपूर (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), द्वारकानगरी, बजाज नगर (1), एकदंत रेसिडन्सी, बजाज नगर (1), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (2), संगम नगर, बजाज नगर (5), वडगाव, बजाज नगर (2), वळदगाव, बजाज नगर (2), नंदनवन सो, बजाज नगर (2), सारा किर्ती, बजाज नगर (1), नवजीवन सो, बजाज नगर (2), न्यू सह्याद्री सो, मोरे चौक, बजाज नगर (1), वंजारवाडी (8), शिवशंभो सो, बजाज नगर (1), सावता नगर, रांजणगाव (1), हतनूर, कन्नड (1), नागापूर, कन्नड (1), कारडी मोहल्ला, पैठण (3), कुंभारवाडा, पैठण (8) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

औरंगाबादेत वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे, तर दुसरीकडे मृतांची संख्या काही दिवसांमध्ये वाढली असली तरी मागील दोन दिवसांमध्ये मृतांची संख्या कमी झाल्याचे दिसून आल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details