पुणे - रविवारी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रात्री भरधाव टँकरने मोपेड दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक वर्षीय चिमुकलीसह 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. उमेहणी सुहेल शेख (वय 1) आणि रहेनाज रिझवान शेख (वय 16) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या पीडितांची नावे आहेत. तर दुचाकी चालविणारा रूकसार रिझवान शेख (वय 24) हा या अपघातात जखमी झाला आहे.
पुण्यात भरधाव टँकरच्या धडकेत १६ वर्षीय तरुणीसह एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू - road accident pune
तक्रारदार रूकसार शेख हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता बहीण रहेनाज आणि मामाची मुलगी उमेहनी यांना घेऊन कोरेगाव पार्क परिसरातून जात होता. रेसिडेन्सियल क्लबसमोरून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रूकसार शेख हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता बहीण रहेनाज आणि मामाची मुलगी उमेहनी यांना घेऊन कोरेगाव पार्क परिसरातून जात होता. रेसिडेन्सीयल क्लबसमोरून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी तिघेही गाडीवरून खाली कोसळले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघींचा मृत्यू झाला तर रूकसार जखमी झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळी न थांबता टँकर घेऊन पळून गेला. जखमी रूकसार शेख यांनी याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.