महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नवी मुंबईत 150 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 111 जणांना डिस्चार्ज

शहरात सद्यस्थितीमध्ये 2 हजार 397 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य आटोक्यात यावी म्हणून नवी मुंबईत सोमवारपासून 29 जून ते 5 जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

New mumbai
New mumbai

By

Published : Jun 27, 2020, 8:15 PM IST

ठाणे- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 6 हजाराच्या पार गेला असून, आजही चक्क 150 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज 111 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत मृतांचा आकडाही 200 च्या घरात पोहोचला असून कोरोनामुळे आज 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गेल्या 20 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या नवी मुंबईत झपाट्याने वाढत आहेत. हे वाढलेले रुग्ण प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 6 हजार 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 19 हजार 410 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 12 हजार 334 जण निगेटिव्ह आले असून, 1 हजार 73 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.

आज आढळलेल्या 150 रुग्णांमध्ये तुर्भेमधील 7, बेलापूरमधील 14, कोपरखैरणेमधील 26, नेरूळमधील 30, वाशीतील 7, घणसोलीमधील 29, ऐरोलीमधील 32, दिघ्यातील 5 चा समावेश आहे. यामध्ये 57 स्त्रिया व 93 पुरुषांचा समावेश आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 3 हजार 405 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. बेलापूरमधील 17, नेरूळमधील 17, वाशीमधील 2, तुर्भेमधील 6, कोपरखैरणेमधील 48, घणसोलीमधील 4, ऐरोलीमधील 12, दिघा 5 अशा एकूण 111 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 43 स्त्रिया आणि 68 पुरुषांचा समावेश आहे.

शहरात सद्यस्थितीमध्ये 2 हजार 397 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्य आटोक्यात यावी म्हणून नवी मुंबईत सोमवार पासून 29 जून ते 5 जुलै दरम्यान लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details