रायगड- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 95 कोरोनाबधितांसह जिल्ह्यात एकूण 142 नवीन रुग्ण आढळले आहेत. आनंदाची बाब म्हणजे 103 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यात आज सर्वाधिक 142 कोरोना पॉझिटिव्ह - पनवेल कोरोना आढावा
जिल्ह्यात आतापर्यत 2 हजार 746 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 1 हजार 839 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 113 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सद्यस्थितीत 794 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

District hospital raigad
जिल्ह्यात आतापर्यत 2 हजार 746 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 1 हजार 839 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 113 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सद्यस्थितीत 794 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पनवेल महानगर पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.