महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

नांदेडमध्ये 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 317 वर - 12 new corona positive nanded

आज नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तर आदिलाबाद येथून 1 बाधित व्यक्ती हा नांदेड येथे संदर्भित करण्यात आला आहे.

Corona update nanded
Corona update nanded

By

Published : Jun 22, 2020, 9:07 PM IST

नांदेड- जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण 59 अहवालांपैकी 45 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तर आदिलाबाद येथून 1 बाधित व्यक्ती हा नांदेड येथे संदर्भित करण्यात आला आहे. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकूण बाधित व्यक्तींची संख्या 317 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये धोबी गल्ली गाडीपुरा येथील 40 वर्षीय पुरुष, रहेमतनगर येथील 22 वर्षीय पुरुष, विलालनगर येथील 37 व 57 वर्षीय पुरुष, पिरबुऱ्हानगर येथील 26, 29, 31 वर्षीय 3 पुरुष आणि भगतसिंग रोड येथील 58 वर्षाचा पुरुष, तसेच नांदेड तालुक्यातील पिंपळगाव येथील 18 व 38 वर्षांच्या 2 महिला, चिखलभोसी 45 वर्षीय महिला आणि रिसनगाव येथील 19 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती दि: 22/06/2020

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5730

• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 5396

• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 3038

• अजून निरीक्षणाखाली असलेले - 82

• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 21

• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 5375

• आज घेतलेले नमुने - 39

• एकूण नमुने तपासणी- 5747

• एकुण पॉझिटिव्ह रुग्ण- 317 (पैकी 4 संदर्भित आलेले आहेत)

• पैकी निगेटिव्ह - 5030

• नमुने तपासणी अहवाल बाकी- 59

• नाकारण्यात आलेले नमुने -91

• अनिर्णित अहवाल – 245

• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 238

• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 14

• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 46 हजार 127 आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details