महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

यवतमाळ जिल्ह्यात दिवसभरात 10 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 13 रुग्ण बरे - 10 new corona positive yavatmal

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 355 वर गेला आहे. यापैकी 259 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 29 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले, तर 462 अहवाल अप्राप्त आहेत.

Corona update Yavatmal
Corona update Yavatmal

By

Published : Jul 8, 2020, 7:12 PM IST

यवतमाळ- गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. आज (8 जुलै) दिवसभरात 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले 13 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये शहरातील तायडे नगर येथील 3 महिला आणि 3 पुरुष असे 6 जण आहे. तसेच नेर तालुक्यातील सिंदखेड येथील एक पुरुष आणि नेर शहरातील मालिपुरा येथील एक पुरुष व 2 महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत.

कालपर्यंत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 86 होती. यापैकी 13 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे हा आकडा 73 वर आला. मात्र आज (8 जुलै) नव्याने 10 जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 83 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 130 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह आणि 120 अहवाल निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 114 जण भरती आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 355 वर गेला आहे. यापैकी 259 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 29 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले, तर 462 अहवाल अप्राप्त आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details