मुंबई- मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 59 नवे रुग्ण आढळून आले असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोना ग्रस्तांचा आकडा 1 लाख 15 हजार 346 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 395 वर पोहोचला आहे. सध्या 20 हजार 746 सक्रिय रुग्ण आहेत.
CoronaVirus : मुंबईत कोरोनाचे 1 हजार 59 नवे रुग्ण, 45 रुग्णांचा मृत्यू - Corona patients number mumbai
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 77 दिवस तर सरासरी दर 0.91 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 614 चाळी आणि झोपडपट्टी कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करून सील करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 77 दिवसांवर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्या 45 रुग्णांपैकी 35 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 25 पुरुष तर 20 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 832 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 87 हजार 906 वर पोहोचला आहे.
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 77 दिवस तर सरासरी दर 0.91 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 614 चाळी आणि झोपडपट्टी कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 409 इमारती व इमारतींच्या विंग सील करण्यात आल्या आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 37 हजार 536 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.