मुंबई- आज मुंबईत कोरोनाचे 1 हजार 46 नवे रुग्ण आढळून आले असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 11 हजार 224 वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 5 हजार 711 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाचे 1 हजार 46 नवे रुग्ण, 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू - Corona patients number
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 55 दिवस तर सरासरी दर 1.26 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 691 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांना सील करण्यात आले आहे.

आज मृत्यू झालेल्या 64 रुग्णांमध्ये 51 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 39 पुरुष तर 25 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 193 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 71 हजार 685 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 11 हजार 224 रुग्ण असून 71 हजार 685 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 23 हजार 828 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 55 दिवस तर सरासरी दर 1.26 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 691 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांना सील करण्यात आले आहे. तसेच 6 हजार 163 इमारती व इमारतींच्या विंग सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 33 हजार 227 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.