मुंबई - मुंबईत आज 1 हजार 308 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 91 हजार 457 वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 5 हजार 241 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 497 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णांचा आकडा 63 हजार 431 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 779 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 69 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 39 जणांचा मृत्यू झाला आहे. 39 मृत्यूपैकी 32 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 25 पुरुष आणि 14 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 26 जणांचे वय 60 वर्षावर तर 10 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 1 हजार 497 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 63 हजार 431 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 91 हजार 457 रुग्ण आहेत. त्यापैकी 5 हजार 241 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 22 हजार 779 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.