अकोला - आज सकाळी 76 कोरोना संशयितांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात एक जण पॉझिटिव्ह सापडला आहे. तर एका रुग्णाचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळी मिळालेल्या अहवालांमध्ये एकच व्यक्ती पॉझिटिव्ह मिळाल्याने शहरवासियांसाठी ही बातमी काहीशी दिलासादायक आहे.
पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती ही महिला रुग्ण असून ती दगडी पूल येथील रहिवासी आहे. दरम्यान, आज 23 जून रोजी पहाटे बाळापूर येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही महिला 12 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा आज पहाटे 3 वाजता मृत्यू झाला आहे.
आजचा अहवाल
प्राप्त अहवाल- 76
पॉझिटीव्ह- 1