नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे जवान अभिनंदन वर्धमान आज मायदेशात परतणार आहेत. याबद्दलची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत केली. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तत्काळ मुक्त करावे. मात्र, त्यासाठी भारत कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही, असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकिस्तानला नमावे लागले आहे.
विंग कमांडर 'अभिनंदन' भारतात दाखल, सीमेवर भारतीयांचा जल्लोष सुरू - Abhinandan Vardhman
2019-03-01 16:15:50
अभिनंदन थोड्याच वेळात मायभूमीत होणार दाखल, वाघा सीमेवर नागरिकांची गर्दी
LIVE UPDATES
- विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कुटुंबीय वाघा सीमेवर उपस्थित
- वाघा सीमेवर दोन्ही देशांचे अधिकारी पोहोचले
- वाघा सीमेवर नागरिकांची गर्दी, कोणत्याही क्षणी अभिनंदन येऊ शकतात भारतात
- विंग कमांडर अभिनंदन वर्धमानच्या आगमनासाठी अटारी-वाघा सीमा सज्ज, स्थानिकांकडून स्वागताची तयारी
- पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे जवान अभिनंदन वर्धमान आज मायदेशात परतणार आहेत. त्यासाठी त्यांचे आई-वडील चैन्नईहून दिल्लीत जात असतांना विमानातील प्रवाशांनी त्यांचे टाळ्या वाजवत स्वागत केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पाकिस्तानकडून अभिनंदन यांना सोडणे आमचे शांततेच्या दृष्टीने पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अमेरीका, फ्रान्स, ब्रिटन, सौदी अरेबिया या देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला भारतीय वैमानिकाची सुटका करणे भाग पडल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही देशातील संबंध सुधारणार असतील तर आम्ही भारताच्या वैमानिकास सोडण्याचा विचार करणार, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर भारताने संतप्त प्रतिक्रीया दिली. पाकिस्तानने वैमानिकास त्वरीत मुक्त करावे. मात्र, या बदल्यात आपण असा कोणताही करार करणार नाही ज्यामुळे दहशतवादविरोधी कामगिरी कमकूवत होईल, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली. यानंतर पुढच्या परिणामांची दक्षता घेत पाकिस्तनने हा निर्णय घेतला. शिवाय भारताकडून पुढील काळातही पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात येणार असल्याचे भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अभिनंदनसाठी देशभरात प्रार्थना -
पाकिस्तान भारतीय वायुदलाच्या जवानाचा अमानवीय छळ करत आहे. असे करून पाकिस्तान जिनिव्हा कराराचे उल्लंघन करत आहे, असा आरोपही भारताच्या वतिने लावण्यात आला होता. अभिनंदन यांना बिकट समयी धैर्य आणि बळ मिळावे यासाठी संपूर्ण देशभरात प्रार्थना केली जात आहे.
काय होते प्रकरण -
बुधवारी पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईला घाबरून पाकिस्तानच्या वायुदलाने पळ काढला होता. कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनदोस्त केले. तर, भारतालाही आपला एक विमान गमवावा लागला. हा विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यामुळे विमानाचे चालक अभिनंदन वर्धमान यांना पकडण्यात पाकिस्तानला यश आले होते.