सोलापूर- सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला आहे. नामविस्तार कार्यक्रमात मंचावर प्रवेश नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमात गोंधळ - namvistar
2019-03-06 11:31:58
नामविस्तार कार्यक्रमात मंचावर प्रवेश नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याची माहिती
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव देण्याची मागणी धनगर समाजाच्यावतीने करण्यात आलेली होती. यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला आहे.
सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यसभा खासदार विकास महात्मे, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत नामविस्तार कार्यक्रम पार पडला.