TESTING - वरवरा रावसह अनिल गडलिंग यांची सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी माओवाद्यांना मदत - पुणे पोलीस - pune
Breaking News
2019-02-21 19:09:49
पुणे - एल्गार परिषदेच्या खटल्यामध्ये पुणे पोलिसांनी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) माजी जनरल सेक्रेटरी गणपती आणि वरवरा राव यांच्यासह ५ जणांवर १८३७ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले. वरवरा रावसह अनिल गडलिंग यांची सुरक्षा दलांवर हल्ल्यासाठी माओवाद्यांना मदत केल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. त्यांना शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी हे आरोपपत्र बजावण्यात येणार आहे.