महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / breaking-news

वीर जवान नितीन राठोड यांना साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप - हुतात्मा नितीन राठोड

अखेरचा निरोप

By

Published : Feb 16, 2019, 4:13 PM IST

Updated : Feb 16, 2019, 7:16 PM IST

2019-02-16 18:17:31

वीर जवान नितीन राठोड यांना अखेरचा निरोप

बुलडाणा- पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या गावी दाखल झाले आहे. थोड्या वेळापूर्वीच अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आले होते. तेथे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चोरपांगरा या त्यांच्या मुळगावी पार्थिव दाखल झाले आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला आहे.

2019-02-16 16:01:24

वीरमरण आलेल्या नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या गावी दाखल

वीरमरण आलेले जवान नितीन राठोड

बुलडाणा- पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या गावी दाखल झाले आहे.सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर आले होते. तेथे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर चोरपांग्रा या त्यांच्या गावी पार्थिव दाखल झाले आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यासह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय लोटला आहे.

कुटुंबाची परिस्थिती नसताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीन सैन्यात भर्ती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी, असे कुटुंब आहे. 

महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील २ जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी घेऊन जाण्यात येत आहे. चिखलठाणा विमानतळावर अंत्यदर्शन घेण्यासाठी आज नागरिक  दाखल झाले होते. दुपारी बाराच्या सुमारास या दोन्ही जवानांचे पार्थिव विमानतळावर दाखल झाले. सीआरपीएफतर्फे शहिद संजय राजपूत (चोरपांगरा, गोवर्धन नगर, जि. बुलडाणा) आणि शहिद नितीन राठोड (लोणार, जि. बुलडाणा) यांना विमानतळावर श्रद्धांजली वाहण्यात आली. सीआरपीएफचे जवान मानवंदना देताना विमानतळावर शांतता पसरली होती, मात्र त्यानंतर विमानतळ परिसरात नागरिकांनी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली. 

राज्याचे मंत्री बबनराव लोणीकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, इम्तियाज जलील, अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील संजय राजपूत यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने तर नितीन राठोड यांच्या पार्थिव सैन्यदलाच्या वाहनातून मुळ गावी त्यांचे पार्थिव पाठवण्यात आले.

Last Updated : Feb 16, 2019, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details