महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / breaking-news

पुणे कर्णबधिर लाठीहल्ला; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मागवला अहवाल - अहवाल

फडणवीस

By

Published : Feb 25, 2019, 11:47 PM IST

Updated : Feb 26, 2019, 12:01 AM IST

2019-02-25 23:39:00

पुणे -आपल्या न्याय हक्कासाठी पुण्यात आज राज्यातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. त्यानंतर सरकारवर चौफेर टीका करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत पुणे पोलीस आयुक्तालयाकडून अहवाल मागवला आहे. तसेच सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेशही दिले आहेत.

या घटनेवर राज्य सरकारवर चौफेर टीक होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला या कर्णबधिर विद्यार्थ्यांचा शाप लागेल असा आरोप केला. तर बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर गंभीर आरोप करत हे फडणवीस सरकार नसून हे जनरल डायर सरकार आहे. हे विद्यार्थी उपाशी असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शाही भोजन सुरू आहे. राज्यभर प्रचारासाठी हेलिकॉप्टरने सरकारचे मंत्री फिरत आहेत. तर एखाद्या मंत्र्याला इथे पाठवले असते तर आतापर्यंत तोडगा निघाला असता, मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या साडेचार वर्षात केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने प्रत्येक आंदोलन चिरडून टाकले आहे. या लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा हक्क पण या सरकारने हिरावून घेतला आहे, तर आज पुण्यातील कर्णबधिर तरुणाच्या मोर्चावर अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे. ही निषेधार्थ बाब आहे. लाठीहल्ला करण्याइतपत पोलिसांची मजल जातेच कशी? या राज्याला सक्षम गृहमंत्री असावा, अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. ते वारंवार खरे ठरत आहे. शांतपणे मोर्चा काढणाऱ्या मुलांनी असा कोणता गोंधळ घातला, की ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री पूर्णतः अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी आजच्या प्रकारानंतर तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Last Updated : Feb 26, 2019, 12:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details