नवी दिल्ली - एअर इंडिया विमानात प्रवास करताना आता प्रत्येक घोषणेनंतर तुमचे कॅबिन क्रू'जय हिंद' म्हणणार आहेत. एअर इंडियाने असे निर्देश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. हे निर्देश मिळाल्यानंतर तात्काळ लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या प्रत्येक सूचनेनंतर 'जय हिंद' म्हणण्याचे निर्देश - announcement
एअर इंडिया
2019-03-04 23:53:47
एअर इंडियामध्ये एकूण ३५०० कॅबिन क्रू आणि जवळपास १२०० कॉकपिट क्रू कार्यरत आहेत. अश्विनी रोहाणी यांनी एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पद स्वीकारल्यानंतर हा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे २०१६मध्येही व्यवस्थापकीय संचालक पद सांभाळल्यानंतर त्यांनी अशाप्रकारचे निर्देश दिले होते.