नवी दिल्ली - जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयकडून मारहाण झाल्याचा दावा एका महिलेने केला होता. तर तो दावा नाकारत महिलेनेच आपल्याला मारहाण केल्याचे डिलीव्हरी बॉयने सांगितले आहे. याप्रकरणातील ग्राहक महिला हितेशा चंद्रानी आणि डिलीव्हरी बॉय कामराज सध्या सोशल माध्यामावर चर्चेत आहेत. नेमके कोण खरे बोलत आहे, असा प्रश्न नेटेकऱ्यांना पडला आहे. झोमॅटो वादाच्या प्रकरणावर सह संस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विटरवरून स्टेटमेंट जाहीर केलं आहे.
आम्ही या प्रकरणातील सत्य जाणून घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आहोत. हितेशा चंद्रानी आणि कामराज दोघांच्या संपर्कात आहोत. कामराला पोलीस चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्याचा न्यायालयीन खर्चही कंपनी उचलत आहे. झोमॅटो कायमच त्याला मदत करत राहिल. तसेच हिताशा यांच्याही संपर्कात आम्ही आहोत. त्यांच्या वैद्यकीय खर्च आम्ही करत आहोत. शक्य तेवढी मदत कंपनीकडून करण्यात येत आहे. घटनेच्या मुळापर्यंत आम्ही पोहचणार आहोत, असे दीपिंदर गोयल यांनी म्हटलं आहे.