तिरुवनंतपुरम- कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या केरळला आणखी नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. झिका हा विषाणुजन्य रोग केरळमध्ये आढळला आहे. पारसाला येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वायरोलॉजी अर्थात एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच आणखी १३ जणांना झिकाची लागण झाल्याची माहिती आहे.
झिकाची लागण झालेल्या महिलेवर तिरुवनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेला ताप, डोकेदुखीचा त्रास होत असल्याने २८ जुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिरुवनंतपुरम जिल्ह्यात आणखी १३ जणांना झिकाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-तक्रार निवारण अधिकारी नियुक्तीकरिता ट्विटरला हवायं ८ आठवड्यांचा वेळ
ही आहेत लक्षणे-
ताप आणि अंगावर लाल फोड येणे, स्न्यायू दुखणे, सांधे दुखी आणि डोके दुखी हे झिकाची लक्षणे आहेत. संशयित महिलेने ७ जुलैला मुलीला जन्म दिला होता. झिका हा एड्स या डासामुळे होतो. हा डास दिवसभरातून एकदाच मानवाला चावतो. रोगाची लक्षणे दोन ते सात दिवस राहतात. झिकाची लक्षणे दिसण्यासाठी तीन ते १४ दिवस लागतात. तर बहुतांश रुग्णांमध्ये झिकाची लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. या विषाणुमुळे रोगी व्यक्तीचा क्वचित मृत्यू होतो.