किव - युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून झेलेन्स्की आणि यूएस अधिकार्यांमध्ये कीवमधील ही पहिली बैठक होती. ( Zelensky Calls For Putin ) व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी या भेटीबद्दल ट्विट केले आणि असे लिहिले की, "आज युक्रेनियन लोक एकजूट आणि मजबूत आहेत आणि युक्रेन-यूएस मैत्री आणि भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे!" अस त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अधिक शक्तिशाली शस्त्र हवे - राष्ट्रपतींचे सहाय्यक ओलेक्सी एरेस्टोविच यांनी रविवारी (YouTube)वर दिलेल्या मुलाखतीदरम्यान बैठकीची पुष्टी केली. ते म्हणाले की "अध्यक्षांशी बोलणे, कदाचित ते मदत करू शकतील." झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितले की वॉशिंग्टनने आतापर्यंत युक्रेनला दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ आहे. आजतरी रशियन सैन्याविरूद्ध वापरण्यासाठी अधिक शक्तिशाली शस्त्र हवे आहेत असही ते म्हणाले आहेत.