महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वायएस शर्मिला यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; पक्षही केला विलीन - राहुल गांधी

YS Sharmila Join Congress : आंध्रप्रदेशातील राजकारणात वायएस जगन मोहन रेड्डी यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र त्यांना त्यांची बहीण वायएस शर्मिला यांनी मोठा धक्का दिला. वायएस शर्मिला यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आपला पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केला आहे.

YS Sharmila Join Congress
YS Sharmila Join Congress

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 2:01 PM IST

नवी दिल्ली YS Sharmila Join Congress :तेलंगाणामध्ये काँग्रेस पक्षानं मोठी मुसंडी मारत सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाल्याचं दिसून येत आहे. वाएसआर तेलंगाणा पक्षाच्या नेत्या वायएस शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वायएस शर्मिला यांनी आपला पक्षही काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. वायएस शर्मिला यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

वायएसआरटीपी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन :वायएस शर्मिला या बुधवारी संध्याकाळी विजयवाडावरुन थेट दिल्लीत दाखल झाल्या. त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयात पोहोचत गुरुवारी सकाळी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे पती अनिल यांचीदेखील उपस्थिती होती.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहेत वायएस शर्मिला :वायएस शर्मिला या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहेत. वायएस शर्मिला यांचे वडील दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानं याबाबत मोठी उलट-सुलट चर्चा करण्यात येत आहे.

काँग्रेस पक्षात मिळणार मोठी जबाबदारी :वायएस शर्मिला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र वायएस शर्मिला यांना काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सध्या आंध्रप्रदेशात आहे. वायएस शर्मिला यांच्या काँग्रेस प्रवेशानं दक्षिणेतील राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

  1. YS Sharmila Slaps SI : वायएस शर्मिला यांनी पोलिसाला लावली थप्पड, लेडी कॉन्स्टेबलला मारला धक्का, पोलिसांनी केली अटक
  2. Telangana Assembly Election : YSRTP ची तेलंगणा विधानसभा निवडणुकीतून माघार, कॉंग्रेसला पाठिंबा

ABOUT THE AUTHOR

...view details