नवी दिल्ली - गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार स्टॅन ब्राऊनी याने अजब कामगिरी केली आहे. स्टॅन ब्राऊनी, अर्जेन अल्बेर्स हे दोघेही नेदरलँडचे नागरिक असून युट्यूब चॅनल चालवितात. ब्राऊनीने हे रेकॉर्ड बेल्जियममधील होएव्हेनेनच्या हवाई हद्दीत हेलिकॉप्टरला लटकून ( Pull Ups From Helicopter ) केले. याचवेळी ब्राऊनीच्या आधी अर्जेन याने हेलिकॉप्टरला लटकत 24 पुल अप्स मारले. त्यानंतर थोड्याच वेळात ब्राऊनीने अर्जेनने केलेला हा विक्रम मागे टाकला. एका मिनिटात त्याने ही कामगिरी केली आहे.
Guinness World Record : हेलिकॉप्टरला लटकून त्याने मारले 25 पुल अप्स; गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद - मारले 25 पुल अप्स
विश्वविक्रम कोण कशाप्रकारे करेल याचा काही नेम नाही. त्यासाठी तरुणांमध्ये तर चढाओढ लागलेली असते. आता हेच पहा ना नेदरलँडच्या तरुणाने चक्क हेलिकॉप्टरला लटकून चक्क 25 पुल अप्स ( Pull Ups From Helicopter ) मारले. त्याच्या या कामगिरीने त्याला थेट गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पोहोचविले आहे. एका मिनिटात त्याने ही कामगिरी केली आहे.
![Guinness World Record : हेलिकॉप्टरला लटकून त्याने मारले 25 पुल अप्स; गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद Guinness World Record](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16039038-thumbnail-3x2-helicoptor.jpg)
Guinness World Record
बेल्जियममध्ये केला विक्रम - ब्राऊनीने हेलीकॉप्टरला लटकून पुल अप्स मारण्याचा हा विक्रम शनिवारी 6 जुलै रोजी केला. ब्राऊनीने 25 पुल अप्स करण्याचा विक्रम करण्याआधी त्याच हेलिकॉप्टरला लटकून अर्जेनने 24 पुल अप्स मारले. त्याने याआधीचा हेलिकॉप्टरला लटकून 23 पुल अप्स मारण्याचा विक्रम मोडला. अमेरिकेच्या रोमन सार्डनच्या नावे हा विक्रम होता.
हेही वाचा -Isro sslv launch : इस्रोने देशातील सर्वात लहान रॉकेट SSLV-D1 केले प्रक्षेपित; उपग्रहाशी संपर्क तुटला
Last Updated : Aug 8, 2022, 1:00 PM IST