महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खतरनाक! गर्लफ्रेंडच्या वडिलांना अडकवण्यासाठी थेट योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी - गर्लफ्रेंडच्या वडिलांना अडकवण्याचा प्लान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सिरफिऱ्या व्यक्तिला कानपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. आपल्या प्रेयसीच्या वडिलांना अडकवण्यासाठी या माथेफिरू तरुणाने हा कट रचला होता.

योगी आदित्यनाथ यांना धमकी
योगी आदित्यनाथ यांना धमकी

By

Published : Apr 25, 2023, 6:28 PM IST

Updated : Apr 25, 2023, 6:35 PM IST

आरोपीसह पोलीस

कानपूर (उत्तर प्रदेश) : ज्या योगी सरकारमध्ये माफिया अतिक अहमद आणि अश्रफ यांची हत्या झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वेगवेळ्या ठिकाणाहून धमक्या येत आहेत. यामध्ये एका सिरफिऱ्या व्यक्तिने योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याला आज मंगळवारी कानपूरच्या बाबूपुरवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे.

आरोपी अमीनचे वय १८ वर्षे : पोलीस सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशी दरम्यान आरोपी अमीनने सांगितले की, त्याला त्याच्या प्रियसीच्या वडिलांना यामध्ये अडकवायचे होते. यासाठी त्याने 10 दिवसांपूर्वी त्याने प्रियसीच्या वडिलांचा मोबाईल चोरला होता. त्यानंतर त्याच मोबाईलवरून डायल-112 वर धमकीचे संदेश पाठवण्यात आले. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी लखनऊ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र, हा तरुण कानपूरचा असल्याची माहिती कानपूर पोलिसांना मिळताच त्यांनी पुराव्याच्या आधारे तरुणाला तात्काळ अटक केली. सध्या आरोपी अमीनने आपले वय १८ वर्षे असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. आता पोलीस त्याच्या कागदपत्रांवरून त्याचे वय जाणून घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवली : पोलीस सहआयुक्तांनी सांगितले की, त्याच्या प्रियसीच्या वडिलांना तो अजिबात आवडत नाही. त्यावरून त्याने हा प्रयत्न केला. त्यामुळेच मुद्दाम त्याने असा कट रचला. प्रेयसीच्या वडिलांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तर या गंभीर प्रकरणात पोलीस त्याला अटक करून तुरुंगात पाठवतील, असे त्याला वाटले. परंतु, पोलिसांनी अमीनलाच अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यापासून यूपी पोलीस अलर्ट मोडमध्ये असून, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

मोबाइल चोरला आणि त्याचे सिम त्याच्या मोबाइलमध्ये ठेवले : आज डायल 112 वर कॉल आला होता, ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी तत्काळ कारवाई करत पोलिसांनी बाबू पूर्वा येथून अमीन उर्फ छोटू याला अटक केली आहे. ज्यांच्याकडून मोबाईल फोन आणि सिम जप्त करण्यात आले आहे. त्याने सांगितले की, हा मोबाईल सज्जाद हुसैन नावाच्या व्यक्तीच्या घरातून 10 दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. आरोपीने सांगितले की, त्याला सज्जाद हुसेनला गोवायचे आहे, म्हणून त्याने त्याचा मोबाइल चोरला आणि त्याचे सिम त्याच्या मोबाइलमध्ये ठेवले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीचा फोन केला.

हेही वाचा :दहशतवादी संबंध असलेल्या झीशानला पासपोर्ट मिळवण्यासाठी अश्रफचे प्रयत्न, पत्र झाले व्हायरल

Last Updated : Apr 25, 2023, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details