हैदराबाद :अग्निवीर योजनेवरून देशभरात हिंसाचार ( Violence over Agniveer Scheme )उसळला आहे. विविध ठिकाणी रेल्वेगाड्यांना लक्ष्य केले जात आहे. यूपी आणि बिहारनंतर आता हैदराबादमध्ये रेल्वेची जाळपोळ झाली. सशस्त्र दलातील भरतीशी संबंधित केंद्राच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात शुक्रवारी संपूर्ण दक्षिणेकडील राज्यात निदर्शने ( Agnipath Scheme Protest ) झाली. येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर अज्ञात लोकांनी पॅसेंजर ट्रेनचा पार्सल डबा पेटवून दिला. दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, आंदोलकांनी लष्कराच्या नोकऱ्यांमध्ये सामान्य भरतीची मागणी करत केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी आधीच सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर आधीच सिकंदराबादला पोहोचण्याचा संदेश प्रसारित केला होता. त्यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ( Messages through WhatsApp group ) आंदोलनाच्या कटाची माहिती शेअर केली. तेलंगणातील विविध जिल्ह्यातील तरुण गुरुवारी रात्री शहरात पोहोचले होते. सर्वप्रथम त्यांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकासमोर धरणे आंदोलन सुरू केले. जिथे काही आंदोलकांनी स्थानकाबाहेरील बसच्या खिडक्या फोडल्या.