महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चोरीच्या संशयातून युवकाचे 'मॉब लिंचिंग'; झारखंडमधील धक्कादायक प्रकार

पोलीस अधीक्षक नौशाद अलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका गाडीची चाकं आणि बॅटरी काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी लोकांना जाग आलेली पाहताच, त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्याला पकडून त्याचे हात आणि पाय बांधत त्याला अमानुष मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला...

youth-lynched-to-death-over-theft-suspicion-in-ranchi
चोरीच्या संशयातून युवकाचे मॉब लिंचिंग; झारखंडमधील धक्कादायक प्रकार

By

Published : Mar 14, 2021, 4:01 PM IST

रांची : झारखंडमध्ये चोरीच्या संशयातून एका २६ वर्षीय युवकाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. यामध्येच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. टायर आणि गाड्यांची बॅटरी चोरण्याच्या संशयातून शनिवारी रात्री हा प्रकार घडला. मुबारक खान असे या तरुणाचे नाव होते. त्याला वीजेच्या खांबाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मुबारकचा भाऊ तबरक खान याने २० व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण..

पोलीस अधीक्षक नौशाद अलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका गाडीची चाकं आणि बॅटरी काढून घेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी लोकांना जाग आलेली पाहताच, त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी त्याला पकडून त्याचे हात आणि पाय बांधत त्याला अमानुष मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. सध्या आम्ही प्रत्येक बाजूने या घटनेचा तपास करत आहोत, असेही नौशाद यांनी स्पष्ट केले.

चोरीच्या संशयातून युवकाचे मॉब लिंचिंग; झारखंडमधील धक्कादायक प्रकार

चोरीबाबत तपास सुरू..

चोरी झाली होती की नव्हती याबाबत विचारले असता अलम म्हणाले, की याबाबत तपास सुरू आहे. ज्या गाडीची चाकं चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या तरुणावर होता, त्याच्या चाकांचे आणि बॅटरीचे स्क्रू काढण्यात आले होते. यापूर्वीही या तरुणाला याबाबत ताकीद दिली असल्याचेही आम्हाला समजले आहे, असे नौशाद म्हणाले.

काही जणांना घेतले ताब्यात..

यानंतर मुबारकच्या भावाने पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. याप्रकरणी तातडीने कारवाई करत लोकांना अटक करण्यात यावी अशी त्याची मागणी होती. पोलिसांनी घटनास्थळी तणाव आटोक्यात आणण्यासाठी काही लोकांना ताब्यात घेतले. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री एकच्या सुमारास घडली, तर त्यांना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास याबाबत माहिती देण्यता आली. यापूर्वी आठ मार्चलाही सचिन वर्मा या तरुणालाही गाडी चोरण्याच्या संशयातून मारहाण करत मारुन टाकण्यात आले होते.

हेही वाचा :आंध्र प्रदेशात भीषण अपघात; 6 जण ठार तर 7 जण

ABOUT THE AUTHOR

...view details