सारण (बिहार) -येथील एका तरुणाने रक्षाबंधनाच्या दिवशी सापाला राखी बांधण्याचा प्रकार समोर आला. मनमोहन उर्फ भूअर असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
मनमोहन गेल्या अनेक वर्षांपासून सापांना पकडतो. जखमी सापांवर उपचार करतो. त्यांना जीवदान देतो. इतकेच नाही तर सर्पदंश झालेल्यांनाही मदत करतो. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी तो सापाला राखी बांधायला गेला. मात्र, यावेळी सापाने त्याला दंश केला. यामुळे मनमोहन याचा मृत्यू झाला. मृत महमोहन सारणच्या मांझी सीतलपुर येथील रहिवाशी आहे. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली.