नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता वयाची १७ वर्षे पूर्ण झाल्यावर तरुणांना मतदार ओळखपत्राची अर्ज करता येणार ( Apply for Voter ID at the age of 17 ) आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 17 वर्षीय तरुणांनी 1 जानेवारी रोजी 18 वर्षे पूर्ण होण्यासाठी पूर्व-आवश्यक निकषांची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. ( ECI Voter Registration )
वर्षातून तीनदा अर्ज :या संदर्भात, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ( Chief Election Commissioner Rajeev Kumar ) आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे ( Election Commissioner Anoop Chandra Pandey ) यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तांत्रिक उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरुन तरुणांना वर्षातून तीनदा आगाऊ अर्ज भरण्याची सोय करता येईल.