लखनौ - शुक्रवारी लखनौच्या मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ( Video Viral On Social Media ) झाला आहे. एका मुलीने तरुणाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. लखनौमध्ये बारमध्ये अश्लिलता करणाऱ्या युवकाला या तरुणीने बदडून काढले. दरम्यान, लखनौमध्ये बारच्या नावाखाली विनयभंग आणि अश्लील चाळे सुरू आहे. पोलिस प्रशासन मात्र याबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.
विनयभंग आणि मारहाणीचे प्रकरण -येथील समीट बिल्डिंगमध्ये बांधलेल्या बारमध्ये विनयभंग आणि मारहाणीचे प्रकरण सातत्याने होत असल्याच्या तक्रारी आहेत. आता विभूती खांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅफेबाहेर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मुलीने अश्लिलता करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले आहे.