महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटक : कलबुर्गीयेथील युवा अधिकारी गुरुराजा मिरगी यांचा कोरोनामुळे मृत्यू - गुरुराजा मिरगी यांचा कोरोनाने मृत्यू

नऊ वर्षांपासून अफजलपुरा येथे ग्रेड असिस्टेंट म्हणून कार्यरत असलेले फील्ड ऑफिसर गुरुराजा मिरगी (33) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

kalburgi Gururaja mirgi news
कर्नाटक : कलबुर्गीयेथील युवा अधिकारी गुरुराजा मिरगी यांचा कोरोनामुळे मृत्यू

By

Published : May 20, 2021, 4:43 PM IST

कलबुर्गी (कर्नाटक)- अफजलपुरा येथील फील्ड ऑफिसर गुरुराजा मिरगी (33) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते गेल्या नऊ वर्षांपासून येथे ग्रेड असिस्टेंट म्हणून कार्यरत होते. एक आठवड्यापूर्वी त्यांना ताप आला होता. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. मात्र, उचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

9 वर्ष शिक्षणाधिकारी म्हणून दिली होती सेवा -

विजयपूर जिल्ह्यातील अमेला गावात त्यांचा जन्म झाला होता. तसेच 2002 मध्ये त्यांनी कर्नाटक राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची अफजलपूरा शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली होती. येथे त्यांनी 9 वर्ष आपली सेवा दिली.

हेही वाचा - सोनाली कुलकर्णी वाढदिवशीच चढली बोहल्यावर, फक्त १५ मिनिटांत उरकले लग्न!

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details