लखनऊ - यूपीच्या सीतापूरमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भगवे कपडे घातलेला एक तरुण द्वेषपूर्ण भाषण देताना दिसत आहे. मुस्लिम धार्मिक स्थळाबाबत प्रक्षोभक भाषणे देण्याबरोबरच मुस्लिम महिलांचे अपहरण करून मुस्लिम महिलांवर बलात्कार करण्याच्या धमक्या हा तरुण देत असल्याचे दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ सीतापूरमधील खैराबादचा आहे. त्याचबरोबर पोलिसांनी व्हिडिओ तपासून कारवाईचे आश्वासन दिले आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये, सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद येथील एका मशिदीबाहेर एका सभेला संबोधित करत आहे. भगवा परिधान केलेला युवक एका मुस्लिम धर्मस्थळाबद्दल चिथावणीखोर भाषण करताना दिसत आहे. यासोबतच तो मुस्लिम महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करण्याची धमकी देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कारमध्ये बसलेला कथित महंत म्हणत आहे की, मुस्लिम भागातील मुलीची कोणी छेड काढली तर, मुस्लिम महिलांचे अपहरण करून सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करेल, असेही तो आपल्या भाषणात म्हणत आहे. तर दुसरीकडे जय श्री रामचा नारा देत जमाव त्यांचा जयजयकार करत आहे.